पुण्यात सुनेचा छळ केल्याप्रकरणी काँग्रेसच्या माजी आमदारासह चौघांवर गुन्हा दाखल - काँग्रेसचे माजी आमदार बाळासाहेब
तक्रारदार यांना डायबिटीज आहे. त्या कारणावरून आणि तक्रारदार यांनी पतीला अनैतिक संबंधाचा जाब विचारल्याच्या कारणावरुन आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली. मानसिक आणि शारीरिक छळ करत मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

पुणे -काँग्रेसचे माजी आमदार बाळासाहेब उर्फ चंद्रकांत विठ्ठलराव शिवरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब शिवरकर यांची सून स्नेहा अभिजित शिवरकर (वय 37) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार वानवडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती अभिजित चंद्रकांत शिवरकर (वय 38), सासरे बाळासाहेब उर्फ चंद्रकांत विठ्ठलराव शिवरकर (वय 69), सासू कविता चंद्रकांत शिवरकर (वय 66) आणि सोनाली सिद्धार्थ परदेशी (वय 40) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना डायबिटीज आहे. त्या कारणावरून आणि तक्रारदार यांनी पतीला अनैतिक संबंधाचा जाब विचारल्याच्या कारणावरुन आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली. मानसिक आणि शारीरिक छळ करत मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा -सख्ख्या बहिणीचे नवऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, महिलेने केला तीन वर्षीय भाच्याचा खून