महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणुकीच्या काळात पालकमंत्र्यांनी पुणेकरांचे हक्काचे पाणी दौंडला सोडून महापाप केले - काँग्रेस - daund

निवडणुकीच्या काळात गिरीश बापट यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातली दौंड भागाला पुणेकरांच्या हक्काचे पाणी सोडले. त्यामुळे सध्या पुणेकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागल्याने याला जबाबदार पालकमंत्री असल्याचा आरोप मोहन जोशी यांनी केला

काँग्रेसची पत्रकार परिषद

By

Published : May 2, 2019, 4:56 PM IST

पुणे- शहराचा पाणीप्रश्न आता चांगलाच गंभीर बनत चालला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात दौंडला पुणेकरांचे हक्काचे पाणी सोडून पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापाप केल्याचा आरोप, काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी यांनी केला आहे.

काँग्रेसची पत्रकार परिषद

काँग्रेस भवन येथे साध्वी प्रज्ञा सिंह यांची पाठराखण करणारे भाजप सरकारविरोधात काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पुण्याच्या पाणीप्रश्नाबाबत काँग्रेसने यापूर्वी अनेक आंदोलने केली. निवडणुकीच्या काळात गिरीश बापट यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातली दौंड भागाला पुणेकरांच्या हक्काचे पाणी सोडले. त्यामुळे सध्या पुणेकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागल्याने याला जबाबदार पालकमंत्री असल्याचा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे.

त्यामुळे भर उन्हाळ्यात पुण्याच्या पाणीप्रश्नावरून राजकारण तापणार हे मात्र नक्की आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details