महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Congress Celebration For Rahul Gandhi: राहुल गांधींच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; काँग्रेसकडून पुणे, मुंबईत जल्लोष साजरा - Rahul Gandhi conviction

मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला आज (शुक्रवारी) सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यानंतर आज पुणे आणि मुंबई शहरात काँग्रेस पक्षाकडून पेढे आणि जिलेबी भरवत जल्लोष साजरा करण्यात आला आहे.

Congress Celebration For Rahul Gandhi
कॉंग्रेस

By

Published : Aug 4, 2023, 7:36 PM IST

Updated : Aug 4, 2023, 9:22 PM IST

कॉंग्रेस कार्यकर्ते जल्लोष करताना

पुणे : येथील काँग्रेस भवनात पुणे शहर काँग्रेसकडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, विरोधकांना संपवण्याचे जे कटकारस्थान आणि डाव भाजपने केला होता त्याला आज सर्वोच्च न्यायालयाने चाप लावला आहे. आम्ही त्यावेळेस देखील म्हटले होते की, आजपर्यंत कधीही एवढी शिक्षा कोणालाही झाली नव्हती; पण राहुल गांधी यांनी संसदेत उभे राहून अदानी यांचे भ्रष्टाचाराचे विषय काढले होते आणि ते संसदेत पुन्हा काढू नये म्हणून त्यांची खासदारकी घालवली गेली. राहुल गांधी यांना न्यायालयात खेचून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली; पण आज सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिली. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो, असे यावेळी अरविंद शिंदे म्हणाले.

राहुल गांधींविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोले

मुंबईतही कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला :राहुल गांधी यांना गुजरात न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मुंबईतही कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. एकंदरीत महाराष्ट्रातील काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस आमदारांकडून राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत जल्लोष करण्यात आला. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी, आमदारांनी मुंबईत विधानभवनाच्या पायऱ्यांवर येऊन राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी आमदारांनी राहुल गांधी यांचा फोटो देखील हातात घेतला होता. आनंदोत्सवावेळी जिलेबी देखील एकमेकांना भरविण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार देखील उपस्थित होते.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर राहुल गांधींचा फोटो घेऊन कॉंग्रेस नेत्यांचा जल्लोष


सत्यमेव जयते-नाना पटोले :आमच्या देशाची जी संस्कृती आहे त्या 'सत्यमेव जयते' या ब्रीदवाक्याचाच विजय आज झाला आहे. खोटी केस दाखल करून राहुल गांधी यांना शिक्षा झाली होती; पण सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वाचा निर्णय दिला. न्याय व्यवस्थेवर जनतेचा विश्वास दृढ झाला आहे. 'मोहब्बत की दुकान' जे राहुल गांधी यांनी उघडले आहे त्याचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करताना कॉंग्रेस कार्यकर्ते


लवकरच संसदेत दिसतील राहुल गांधी :राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे ते लवकरच संसदेत पाहायला मिळतील, अशा प्रकारची प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. खरंतर राहुल गांधी यांच्या संदर्भातील शिक्षेबाबत गुजरात न्यायालयावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. अशा प्रकरणात कोणत्याही खासदाराला दोन वर्षांची शिक्षा न्यायालयाकडून इतिहासात आजपर्यंत ठोठावली गेली नाही. या निर्णयामुळे येणाऱ्या निवडणुकीत निश्चितच 'इंडिया'ला फायदा होणार आहे, असे मत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

हेही वाचा:

  1. Rahul Gandhi : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; सांगितला पुढचा प्लॅन
  2. Rahul Gandhi : राहुल गांधींचा संसदेत 'कमबॅक', अविश्वास प्रस्तावावरील चर्चेतही होणार सहभागी
  3. SC Stay Conviction Rahul Gandhi : 'मोदी' प्रकरणी राहुल गांधींना 'सर्वोच्च' दिलासा
Last Updated : Aug 4, 2023, 9:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details