पुणे - पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा उमेदवार अद्यापही घोषित झालेला नाही. बुधवारी रात्रीपर्यंत काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे शहरातून इच्छुक असलेल्या उमेदवारांपैकी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यांचे नाव काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे.
पुणे लोकसभा जागेसाठी आज ठरणार काँग्रेसचा उमेदवार ? - Lok Sabha
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा उमेदवार अद्यापही घोषित झालेला नाही. बुधवारी रात्रीपर्यंत काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बुधवारी काँग्रेस भवन येथे संयुक्त बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते, शहराध्यक्ष, शहरातील खासदार वंदना चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच काँग्रेसकडून काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी शहराध्यक्ष यांच्यासह इच्छुक उमेदवारदेखील उपस्थित होते.
निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टिकोनातून संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. पुणे लोकसभेसाठी उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर पुणे आणि बारामती मतदार संघातील आघाडीच्या उमेदवार एकत्रित रित्या उमेदवारी अर्ज भरतील, असे यावेळी जाहीर करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मित्रपक्ष जोरदार लढा देतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.