महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसचे आंदोलन म्हणजे केंद्र सरकारचे अपयश - वळसे पाटील - पुणे जिल्हा लेटेस्ट न्यूज

केंद्र सरकारविरोधात काँग्रेसकडून सुरू असलेले आंदोलन हे भाजपाचे अपयश आहे, अशी टीका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून, त्यांना आपली कामगिरी सुधारावी लागेल असं देखील यावेळी वळसे पाटील यांनी म्हटले आहे. ते एका वृक्ष संवर्धन कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

दिलीप वळसे पाटील
दिलीप वळसे पाटील

By

Published : May 30, 2021, 8:21 PM IST

पुणे -केंद्र सरकारविरोधात काँग्रेसकडून सुरू असलेले आंदोलन हे भाजपाचे अपयश आहे, अशी टीका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून, त्यांना आपली कामगिरी सुधारावी लागेल असं देखील यावेळी वळसे पाटील यांनी म्हटले आहे. ते एका वृक्ष संवर्धन कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीची यंत्रणा सज्ज आहे. टास्कफोर्सच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन काम सुरू आहे. म्युकरमायकोसिस संदर्भात देखील टास्कफोर्स शासनाला मार्गदर्शन करत आहे, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. यावेळी बोलताना त्यांनी अनिल परब प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. अनिल परब यांच्यावर आरोप करणे हे भाजपाचे नवीन सुरू झाले आहे. याप्रकरणी जास्त बोलणे उचित ठरणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे आंदोलन म्हणजे केंद्र सरकारचे अपयश

वृक्ष संवर्धनाचा उपक्रम कौतुकास्पद - वळसे पाटील

वृक्ष संवर्धन कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, लोकसंख्या व शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. पण त्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली नाही. वाढते तापमान, हवेचे प्रदुषण, कोरोनाच्या संकटात कृत्रिम ऑक्सिजन समस्येला तोंड द्यावे लागले. या पार्श्वभूमीवर नैसगिक ऑक्सिजन निर्मितीसाठी अण्णासाहेब आवटे महाविद्यालय व ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेने १० एकर खडकाळ माळरान जमीन विकसित केली. तेथे केशर आंब्यासह फळझाडांची लागवड उपक्रम हाती घेतला आहे. हा वृक्ष संवर्धनाचा उपक्रम कौतुकास्पद आहे.

हेही वाचा -'मन की बात' : शतकातील सर्वात मोठ्या महामारीविरोधात भारत ताकदीने लढतोय

ABOUT THE AUTHOR

...view details