पुणे - केंद्र सरकारने केलेल्या इंधन दर वाढी विरोधात शनिवारी पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सातारा रोडवर इंधन दर वाढी विरोधात आंदोलन केले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच दुचाकी ढकलत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध केला.
इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन, दुचाकी ढकलत निदर्शने
केंद्र सरकारने केलेल्या इंधन दर वाढी विरोधात शनिवारी पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सातारा रोडवर इंधन दर वाढी विरोधात आंदोलन केले.
आता स्मृती ईराणी कुठे गेल्या?
युपीए. सरकारच्या काळात आंरराष्ट्रीय बाजारामध्ये इंधनाचे दर वाढलेले असताना देखील युपीए सरकारने सर्वसामान्य लोकांना इंधनाची योग्य दरात विक्री केली. मात्र एनडीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे कमी असताना देखील सरकार खुप जास्त दरात इंधन विक्री करत आहे. ही एकप्रकारे सर्वसामान्य जनतेची लूट आहे. सन 2014 ला युपीएची सत्ता असताना केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी या इंधन दरवाढी विरोधात सारखे रस्त्यावर उतरून आंदोलन करायच्या, मात्र आता स्मृती ईराणी कुठे गेल्या? त्यांना आता झालेली इंधन दर वाढ दिसत नाही का ? असा सवाल यावेळी अभय छाजेड यांनी उपस्थित केला.
यावेळी संजय बालगुडे, पुणे मनपाचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल तसेच माजी महापौर कमलताई व्यवहारे, सोनाली मारणे हे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
हेही वाचा -गोव्यात 51 व्या इफ्फीचा शानदार शुभारंभ; मनोवेधक सांस्कृतिक कार्यक्रमाने भरला रंग