पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात संगणक अभियंत्याने प्रेयसी बरोबर झालेल्या किरकोळ भांडणामधून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. दोघे ही उच्चशिक्षित असून हिंजवडीमधील नामांकित कंपनीत कामाला होते. ही घटना दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरात घडली आहे. राहत्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावर जाऊन प्रियकराने आत्महत्या केली.
प्रसून कुमार झा (वय-२८ रा. लॉरेल सोसायटी, वाकड) असे आत्महत्या केलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. तो २९ वर्षीय आपल्या प्रेयसीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये गेल्या नऊ महिन्यांपासून राहत होता.
किरकोळ कारणावरून संगणक अभियंत्याची पिंपरी-चिंचवडमध्ये आत्महत्या - पिंपरी-चिंचवडमध्ये किरकोळ कारणावरून संगणक अभियंत्यांची आत्महत्या
प्रसून कुमार झा हा मूळचा बिहार येथील आहे. त्याने दोन दिवसांपूर्वी बाराव्या मजल्यावरून उडी घेत आपले आयुष्य संपवले. २९ वर्षीय प्रेयसी मूळची डेहराडून येथील आहे. या आत्महत्येचे कारण अस्पष्ट होते. मात्र, पोलिसांच्या तपासात कारण समोर आले आहे.
प्रसून कुमार झा हा मूळचा बिहार येथील आहे. त्याने दोन दिवसांपूर्वी बाराव्या मजल्यावरून उडी घेत आपले आयुष्य संपवले. २९ वर्षीय प्रेयसी मूळची डेहराडून येथील आहे. या आत्महत्येचे कारण अस्पष्ट होते. मात्र, पोलिसांच्या तपासात कारण समोर आले आहे.
प्रसून हा हिंजवडीमधील एका नामांकित कंपनीत कामाला होता. तसेच त्याची प्रेयसीदेखील त्याच कंपनीत काम करत असे. राहण्यास देखील दोघे एकाच सोसायटीमध्ये होते. गेल्या नऊ महिन्यांपासून दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्या लग्नाला घरच्यांची मान्यता मिळाली होती. मात्र, लग्न करायचं की, नाही यावरून दोघांमध्ये मतमतांतर होते. यामुळे त्यांच्यात किरकोळ वाद होत होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली आहे. याच कारणावरून त्याने आत्महत्या केली असावी असे पोलिसांचे म्हणणे आहे.