पुणे- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाच्यावतीने लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र, असे असतानाही दौंड तालुक्यातील काही लोक विनाकारण बाहेर फिरताना दिसून आले आहे. अशा २७ नागरिकांवर यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांच्या वतीने आता ड्रोनच्या सहायाने तालुक्यात नजर ठेवली जाणार आहे.
सदर अटक केलेले २७ नागरिक हे पाटस, बेरीऐंदी, केडगाव, वरवंड, नाथाचीवाडी, खामगाव येथे लॉकडाऊन असतानाही वावरत होते. त्यामुळे यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.
लॉकडाऊन दरम्यान अटक करून गुन्हा दाखल केलेल्यांची नावे पुढील प्रमाणे आहे:
१) स्वप्नील रघुनाथ बनकर २) प्रदिप काळुराम कड (दोघेही रा.कोरेगांवमुळ ता.हवेली जि.पुणे) ३) स्वप्नील मधुकर जगताप (वय २४ वर्ष रा. उरूळीकांचन ता. हवेली जि.पुणे, ) ४) प्रषांत गुलाब कुंभारकर (वय २४ वर्षे रा.उरूळीकांचन तांबेवस्ती ता.हवेली जि.पुणे) ५) साजिद युसुफ (वय २६ वर्षे रा.खामगाव खेडेकरवस्ती ता.दौंड जि.पुणे) ६) अविनाश धनजंय मदने (वय २२ वर्षे रा.खामगाव गाडामोडीचैक ता.दौंड जि.पुणे) ७) आकाश दिपक जगताप (वय २३ वर्ष रा.खामगाव ता.दौंड जि.पुणे) ८) अनिल साहेबराव भंडलकर (वय ३८ वर्षे रा.खामगाव ता.दौंड जि.पुणे) ९) स्वप्नील दिलीप खेडेकर (वय २८ वर्षे रा.खामगाव खेडेकरवस्ती ता.दौंड जि.पुणे) १०) राजेंद्र सोपान पिंगळे (वय २८ वर्षे रा.खामगाव पिंगळेवस्ती ता.दौंड जि.पुणे) यां सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तसेच, ११) प्रविण नानासो पिंगळे (रा.खामगाव गाडामोडी पिंगळेवस्ती ता. दौंड जि. पुणे) १२) संदीप चंद्रकांत पिंगळे (रा.खामगांव गाडामोडी पिंगळेवस्ती ता.दौंड जि.पुणे) १३) नितीन सुदाम पिंगळे (रा.खामगांव गाडामोडी पिंगळेवस्ती ता.दौंड जि.पुणे) १४) पांडुरंग रामराव खेडेकर (रा.खामगांव पिंगळेवस्ती ता.दौंड जि.पुणे) १५) गंगाराम उत्तम लांडगे १६) सुभाष फुलाजी नवगिरे १७) भिमराव लक्ष्मण पवार १८) आकाश मोतीराम कांबळे (सर्व रा.नाथाचीवाडी ता.दौंड जि.पुणे) १९) दिनेश शिवाजी रोकडे २०) निलेश भिमराव पवार (दोंन्ही रा. नाथाचीवाडी ता. दौंड जि. पुणे) २१) राजेश आप्पासाहेब हांडे (वय २६ वर्ष रा.मोरेवस्ती,केडगाव ता.दौंड जि.पुणे) २२) दिनेष भालचंद्र पगारे (वय ५० वर्ष रा.देशमुखमळा केडगाव ता.दौंड जि.पुणे) २३) धर्मराज नारायणराव मुटे (वय २५ वर्ष रा. श्री व्यवहारे यांचे मोरेवस्ती येथील फार्महाउस मोरेवस्ती, केडगाव,ता.दौंड जि.पुणे) २४) मोनह सेन (वय २२ वर्ष रा.पाटस घोलप वस्ती ता.दौड जि.पुणे ) २५) संतोश सोपान पालखे (वय ४० वर्ष) २६) सोमनाथ वसंत केदारी (वय ४२ वर्ष ) २७) बंडू उत्तम रूळसमुद्र (वय ४० वर्ष सर्व रा.वरवंड ता.दौड जि.पुणे) या सर्व व्यक्तींवर भादवीच्या विवध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
त्याचबरोब, राष्ट्रीय आपत्ती कायदा २००५ चे कलम ५१(ब), महाराष्ट्र कोवीड उपाययोजना २०२० चे कलम ११ प्रमाणे साथीचा रोग प्रतिबंधक कायदा १८९७ मधील कलमान्वये आणि कोरोनासाठी केलेल्या उपाययोजनांची पायमल्ली केल्याच्या कारणावरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा-Video: कोरोना विषाणूची दाहकता चिमुकल्या जीवानांही कळालीय