महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दौंड : मनमानी पद्धतीने रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल - दौंड ठेकेदारावर गुन्हा दाखल

केंद्र शासनाकडून मनमाड-नगर-दौंड-बारामती-फलटण या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम केले जात आहे. मागील पाच महिन्यांपासून सोनवडी येथे भीमा नदी पूल-नगर मोरी-रेल्वे उड्डाण पूल-गजानन सोसायटी-गोकूळ हॉटेल-रोटरी सर्कलदरम्यान मनमानी पद्धतीने आणि अतिशय संथ गतीने रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे.

खोदलेला रस्ता

By

Published : Nov 16, 2019, 8:51 AM IST

पुणे -दौंड शहराच्या नागरी वस्तीतून जाणाऱ्या नगर-दौंड-बारामती-फलटण राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम करताना लोकांच्या जीवितास धोका निर्माण करण्याबरोबर वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.

मनमानी पद्धतीने रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल


केंद्र शासनाकडून मनमाड-नगर-दौंड-बारामती-फलटण या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम केले जात आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे याचे कंत्राट आहे. महामंडळाने अग्रवाल कंपनीला रस्त्याच्या कामाचा ठेका दिला आहे. मात्र, मागील पाच महिन्यांपासून सोनवडी येथे भीमा नदी पूल-नगर मोरी-रेल्वे उड्डाण पूल-गजानन सोसायटी-गोकूळ हॉटेल-रोटरी सर्कलदरम्यान मनमानी पद्धतीने आणि अतिशय संथ गतीने रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे.

हेही वाचा - पुण्यातील रस्त्यावर 'बर्निंग कार'चा थरार


पावसाळ्यात खोदकामामुळे रस्त्यात चिखल होऊन दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. चारचाकी आणि अवजड वाहनेही गाळात फसण्याचे प्रकार घडत आहेत. अत्यंत वर्दळीचा असलेला डांबरी रस्त्यावर खोदकाम केल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.


कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नसताना बुधवारी परस्पर रस्ता बंद करून अवजड वाहने व यंत्रे रस्त्यावरच उभी करण्यात आली. या प्रकरणी वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी किरण राऊत यांनी पोलिसांत तक्रार दिली. बेदरकारपणे लोकांच्या जीवितास आणि व्यक्तिगत सुरक्षेस धोका निर्माण करणे व वाहतूकीला प्रतिबंध केल्याप्रकरणी ठेकेदार आणि पर्यवेक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details