पुणे- केंद्र व राज्य सरकारने औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना काही नियम व अटीवर कंपन्या सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये उद्यापासून 800 पेक्षा जास्त लहान-मोठ्या कंपन्या सुरू होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज कंपन्यांमध्ये साफसफाईचे काम सुरू करण्यात आले आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपन्या होणार सुरू, 30 टक्के कामगार करणार काम - चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपन्या होणार सुरू
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना आर्थिक मंदीचे संकट उभे राहिल्याने काही उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानग्या दिल्या आहेत. मात्र, कोरोनाचा समूह संसर्ग होणार नाही यासाठी कंपनी व्यवस्थापनाने 30% कामगारांवर कंपनी सुरू करून उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना आर्थिक मंदीचे संकट उभे राहिल्याने काही उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानग्या दिल्या आहेत. मात्र, कोरोनाचा समूह संसर्ग होणार नाही यासाठी कंपनी व्यवस्थापनाने 30% कामगारांवर कंपनी सुरू करून उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन कंपनी व्यवस्थापनाकडून न झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
कामगारांच्या आरोग्याविषयी सर्व उपाययोजना केल्या असून कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी कंपनी व्यवस्थापन घेत असल्याचे अल्ट्रा इंटरप्राईजेसचे मॅनेजर मुकेश निकम यांनी सांगितले. चाकण एमआयडीसीमध्ये कामगारांच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था व सोशल डिस्टन्सिंचे पूर्ण नियम पाळण्याच्या आदेशावर कंपनी सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे.