महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दौंडमध्ये अडीच लाखांची वाळू चोरी, तक्रार दाखल - illegal sand theft in daud

दौंड तालुक्यातील देऊळगाव गावच्या हद्दीत बेकायदेशीर रित्या वाळू उपसा करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गावकामगार तलाठी यांनी तक्रार दाखल केली आहे. महसूल विभागाच्या संमती शिवाय अडीच लाख रुपये किंमतीची वाळू चोरीला गेली होती.

illegal sand theft in daud
देऊळगाव वाळू चोरी

By

Published : Dec 25, 2020, 7:40 AM IST

दौंड - तालुक्यातील देऊळगाव गावच्या हद्दीत बेकायदेशीर रित्या वाळू उपसा करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गावकामगार तलाठी यांनी तक्रार दाखल केली आहे. महसूल विभागाच्या संमती शिवाय २ लाख ५० हजार रुपये किंमतीची वाळू चोरीला गेली होती. याबाबत दौंड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यात आली आहे .
५० ब्रास वाळुची चोरी
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महसूल विभागाच्या संमती शिवाय सुमारे ५० ब्रास वाळु चोरून नेल्याचा प्रकार घडला देऊळगाव गावच्या हद्दीत घडला आहे. या मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ५० हजार रुपये आहे. देऊळगावचे गावकामगार तलाठी महादेव रामचंद्र जरांडे यांनी याबाबत पाच जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अब्दुल समशेर शेख, समीर झुंबर आंबेकर, दादा झुंबर गिरमकर, अनिल पोपट गिरमकर, मनोज किसन चव्हाण या पाच जणांविरुद्ध वाळू चोरीबाबत फिर्याद देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details