पिंपरी-चिंचवड (पुणे) - सेलिब्रेटी, राजकारणी, व्यापारी या व्यक्तींकडे परवानाधारक पिस्तुल हमखास असते. परंतु, पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र, आता ग्रामरक्षा दलात सहभागी होणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना पडताळणी करून रायफलचा परवाना देण्यात येणार असून यासाठी गुन्हेगारी रेकॉर्ड नसलेल्या व्यक्तींना प्राधान्य देणार असल्याचे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले आहे. मात्र, यासाठी गस्त घालण्याची अट पोलीस आयुक्तांनी घातली आहे. यावेळी त्यांनी पिस्तुल परवाना आणि ग्रामरक्षा दलातील फरक समजावून सांगितला आहे. त्यामुळे सरसकट सर्वांना रायफलचा परवाना मिळणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये ग्रामरक्षा दलात सहभागी होणाऱ्याला रायफल परवाना - कृष्ण प्रकाश - Pimpri-Chinchwad Village Defense Party Latest news
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले की, हा नियमाचा भाग आहे. काही विशिष्ट लोकांनाच पिस्तुल परवाना देण्याऐवजी समाजाच्या सुरक्षेसाठी व्हिलेज डिफेन्स पार्टीमध्ये पेट्रोलिंगसाठी तयारी दर्शविणाऱ्या आणि गुन्हेगारी रेकॉर्ड नसलेल्या व्यक्तींना हा परवाना देणार आहोत. तसेच, त्या व्यक्तीची रायफल विकत घेण्याची ऐपत पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की, सरसकट सर्वांना पिस्तूल परवाना मिळेल, असे पोलीस आयुक्त म्हणाले. त्या व्यक्तीला व्यक्तिगत सुरक्षेऐवजी व्हिलेज डिफेन्स पार्टी म्हणून काम करावे लागेल.
हेही वाचा -भीमाशंकर अभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोन; नागरिकांच्या गैरसमजुती दूर करणार वनविभाग
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ग्रामीण आणि शहरी भाग आहे. त्यामुळे व्हिलेज डिफेन्स पार्टी स्थापन करणे आवश्यक आहे, ही माझी संकल्पना आहे. या संदर्भातील अधिकार पोलीस प्रमुखांना आहेत. व्हिलेज डिफेन्स पार्टी हा प्रकार वेगळा आहे आणि हत्यार परवाना हे दोन वेगळे भाग आहेत. व्हिलेज डिफेन्समध्ये ज्या व्यक्ती काम करण्यासाठी तयार आहेत. अशाच काही व्यक्तींना त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड पाहून रायफल परवाना दिला जाणार आहे. सामाजिक सुरक्षेसाठी, वारंवार गुन्हे घडत असलेल्या ठिकाणी सुरक्षेसाठी तेथील नागरिकांनी रायफल लायसन्ससाठी अप्लाय केल्यास रीतसर प्रक्रिया करून देणार आहोत, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -... तर महाराष्ट्रात कोरोनामुक्त होणारा रत्नागिरी हा पहिला जिल्हा ठरेल - मंत्री उदय सामंत