पुणे -कोरोनाबाधित रुग्णांना ऐनवेळी ॲम्ब्यूलन्स उपलब्ध होत नाही. जवळचे लोकही त्यांना आपल्या वाहनातून रुग्णालयात नेण्यास नकार देत असतात. असे असताना, जुन्नरमधील तीन युवकांनी स्वत:चे वाहन अशा बाधित व्यक्तींना रुग्णालयापर्यंत पोहचविण्यासाठी मोफत उपलब्ध करुन प्रशासनाला मदतीचा हात दिला आहे.
कोरोना काळात एक अनोखा उपक्रम
पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील निलेश चव्हाण या तरूणाने कोरोना काळात एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. तो आपल्या स्वतःच्या वाहनातून कोरोना रुग्णांना रूग्णालयात पोहचवण्याचे कार्य करत आहे. परिसरातल्या धालेवाडी, सावरगाव, वडज परिसरातील विविध गावांतील करोनाबाधित रुग्णांसाठी तो रुग्णालयात जाण्यासाठी स्वत:चे वाहन मोफत उपलब्ध करुन देत आहे. निलेशच्या पावलावर पाऊल ठेवून जुन्नरमधील राज फौंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनीही जुन्नर परिसरातील रुग्णांसाठी ही सेवा देऊ केली आहे. तर जुन्नरच्या पश्चिमेला असलेल्या निरगुडे, आपटाळे, बेलसर, सुराळे, बोतार्डे या गावांतून बाधित होणाऱ्या रुग्णांसाठी कमलेश वंडेकर या तरूणाने देखील आपले स्वत:चे वाहन उपलब्ध करून दिले आहे.
प्रशासनाने या तिघांचे कौतुक केले आहे