महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Combing Oppreshan : पुण्यात कोम्बिंग ऑपरेशन! पोलिसांकडून 72 गुन्हेगारांसह 185 कोयते हस्तगत

पुणे शहरात आगामी होत असलेली अंतराष्ट्रीय जी-२० परीषद, त्याच प्रमाणे प्रजासस्ताक दिना निमीत्त कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी पुणे शहर पोलिसांकडून शहरभर कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये आजपर्यंत एकूण 72 गुन्हेगारांना यामध्ये अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

पोलिसांकडून 72 गुन्हेगारांसह 185 कोयते हस्तगत
पोलिसांकडून 72 गुन्हेगारांसह 185 कोयते हस्तगत

By

Published : Jan 12, 2023, 6:25 PM IST

माहिती देताना पोलीस अधिकारी

पुणे : कोयता घेऊन गुन्हेगारी करत आहे. त्यांच्यावर पोलीसांकडून निगराणी ठेवण्यात येत आहे. तसेच, या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आत्ता पर्यंत 70 जणांवर ज्यांनी कोयते घेऊन गुन्हे केले आहेत.अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, जवळपास या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान जवळपास 185 कोयते हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच, एकूण 72 गुन्हेगारांना यामध्ये अटक करण्यात आली आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.

ऑपरेशनमध्ये 185 कोयते हस्तगत: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांमध्ये कोयता गँगकडून दहशत माजवली जात आहे. या विरोधात पुणे पोलीस ॲक्शन मोडमधे आली असून, गुन्हे शाखेकडून शहरभर कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले असून, शहरात आत्तापर्यंत ज्या गुन्हेगारांनी कोयते घेऊन दहशत पसरवली, तसेच गुन्हे केले आहेत त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असून, आत्तापर्यंत जवळपास या ऑपरेशनमध्ये 185 कोयते हस्तगत करण्यात आले आहे. यामध्ये एकूण 72 गुन्हेगारांना यामध्ये अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून 72 गुन्हेगारांसह 185 कोयते हस्तगत

मागील दोन दिवसांपासून पुण्यात कोम्बिंग ऑपरेशन : पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. त्यात कोयता गँगचा म्होरक्या बिट्टया कुचेकर, साहिल शेख आणि आकाश कांबळे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत ही कारवाई केली आहे. कोयता गँगचे हे सगळे रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्यादरम्यान पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. मागील दोन दिवस पुणे पोलीस कोम्बिंग ऑपरेशन सुरु आहे.

तपासात 698 गुन्हेगार एकाच पत्त्यावर राहत असल्याचे समोर : या ऑपरेशनमध्ये रात्रभर पोलीस शहरातील विविध भागाची झाडाझडती करत आहेत. काल रात्रभरात 32 जणांवर गुन्हे दाखल केले आणि त्यांच्याकडून 38 कोयते जप्त केले आहेत. शहरातील 3,765 गुन्हेगारांची चौकशी केली असून, तपासात 698 गुन्हेगार एकाच पत्त्यावर राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतुसे, 145 कोयते जप्त करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगने धुमाकूळ घातला होता. शहरातील विविध भागात त्यांनी दहशत निर्माण केली होती.

पुणे पोलिसांकडून कोयते जप्त

गुप्तपणे पहाणी करण्यात आली : काल रात्री युनिट-२ कडून स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुलटेकडी पुणे येथे गस्त करीत असताना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती. त्यामध्ये डायस प्लॉट झोपडपट्टी येथील कॅनलच्या बाजूला एक इसम थांबलेले असून त्याचेकडील बारदाना पिशवीमध्ये लोखंडी कोयते आहेत. या बातमीच्या अनुषंगाने युनिट-२ कडील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार खाजगी वाहनांवरुन मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावून गुप्तपणे पहाणी केली. त्यादरम्यान, डायस प्लॉट झोपडपट्टी येथील कॅनलच्या बाजुला थांबलेला दिसला.

स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला पकडून ताब्यात घेवून त्याचे नाव व पत्ता विचारताले, त्यामध्ये त्याचे नाव अक्षय अप्पाशा कांबळे (वय २७ वर्ष रा. स नं ४२९ / ३० डायस प्लॉट, गुलटेकडी पुणे) असे असल्याचे समोर आले आहे. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ किंमत ४,५००/- रु चे एकूण ०९ नग, लोखंडी कोयते मिळून आले आहेत. दरम्यान, त्याच्यावर स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details