पुणे- कोंढव्यातील भिंत कोसळल्याची घटना ताजी असतानाच आंबेगाव बुद्रूक येथेही अशीच घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे सिंहगड महाविद्यालयाची संरक्षण भिंत कोसळून भींतीलगत झोपड्या करून राहणाऱ्या ६ जणांचा मृत्यू झाला. ही घटना काल (सोमवारी) रात्री घडली. या घटनेची चौकशी करणार असून दोषी कारवाई करू, अशी प्रतिक्रिया पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
पुण्यातील सिंहगड महाविद्यालय दुर्घटनेची चौकशी करणार -जिल्हाधिकारी - news
पुण्याच्या कोंढव्यातील भिंत कोसळल्याच्या घटनेनंतर काल रात्री सिंहगड महाविद्यालयाची संरक्षण भींत कोसळून मजूरांचा मृत्यू झाला. यावर पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, यात मानवी आणि नैसर्गिक दोन्ही चुका आहेत. चोकशी करून दोषींवर कारवाई करू.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम
ते या घटनेची पाहणी करण्यासाठी आले होते. ते म्हणाले, तीन दिवसातील ही दुसरी दुर्घटना खरोखरच दुर्दैवी आहे. आजच्या घटनेत मानवी आणि नैसर्गिक दोन्ही चुका आहेत. दोषी असणाऱ्यांवर प्रशासन योग्य ती कारवाई करेल. जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना योग्य ती मदत सरकारच्या वतीने दिली जाईल. पुढे ते म्हणाले कोंढव्याच्या घटनेनंतर समिती स्थापन करण्यात आली असून मुदतबाह्य इमारतींची तपासणी सुरू आहे.
Last Updated : Jul 2, 2019, 11:22 AM IST