महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑक्सिजन प्लांट हाताळणारे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणार - जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख - प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणार

संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये कोणताही रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित राहणार नाही, यासाठीचे आवश्यक ते नियोजन करण्यासोबतच ऑक्सिजन प्लांटसंबंधीत अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षित करुन प्रशिक्षित मनुष्यबळ तयारी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे.

राजेश देशमुख
राजेश देशमुख

By

Published : Aug 27, 2021, 12:44 AM IST

पुणे - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात येत आहे. मागील कोरोना लाटेचा अनुभव विचारात घेत येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये कोणताही रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित राहणार नाही, यासाठीचे आवश्यक ते नियोजन करण्यासोबतच ऑक्सिजन प्लांटसंबंधीत अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षित करुन प्रशिक्षित मनुष्यबळ तयारी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या संबंधित वैद्यकीय अधिक्षक व औषध निर्माण अधिकारी यांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख बोलत होते.

'तिसऱ्या लाटेमध्ये कोणताही रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित नसणार'

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन अभावी विविध अडचणींचा सामना करावा लागला होता. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात येत आहे. या ऑक्सिजन प्लांटसाठी प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी यांची टिम तयार करण्याचे काम सुरु आहे. ऑक्सिजन प्लांटबाबत राज्यशासन व टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांचे पालन करुन दिड वर्षात कोविड संबंधीत अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. मागील कोरोना लाटेचा अनुभव विचारात घेत येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये कोणताही रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित राहाणार नाही, याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा -कोल्हापुरातल्या विद्यार्थिनीला 41 लाखांचे पॅकेज; 'या' कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड

ABOUT THE AUTHOR

...view details