पुणे :परदेशात वाढणारी कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेता रोगाला प्रतिबंध करण्यासाठी तसेच यातून निर्माण होऊ शकणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr Rajesh Deshmukh) यांनी दिले. कोविड-१९ बाबत जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कोविड टास्कफोर्स समितीची बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आली. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अंकित गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते. सद्यस्थितीत चीन, अमेरिका, ब्राझील, इंडोनेशिया आदी देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात व पुणे जिल्ह्यातही खबरदारी म्हणून प्रतिबंधक उपाययोजनांना गती देण्यासाठी आणि यंत्रणांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे (Covid Task Force meeting In Pune) आयोजन करण्यात आले.
आरोग्य यंत्रणा सज्ज :जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात (Corona Cases in Maharashtra) यावी. ऑक्सिजन प्रकल्प, लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज टँक, मेडिकल ऑक्सिजन पाईपलाईन आदी आवश्यक साहित्य सामुग्रीच्या प्रात्यक्षिकात त्रूटी आढळल्या असल्यास त्या तातडीने दूर करण्यात याव्यात. कोविड-१९ च्या संभाव्य स्थितीचा नियोजनबद्धरित्या सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. जास्तीतजास्त पात्र नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी लसीकरण बुथची संख्या वाढविण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बैठकीत (Collector Dr Rajesh Deshmukh held meeting) दिले.