महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केवळ दुष्काळासाठी आचारसंहिता शिथिल; जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती - pune

राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याने आचारसंहिता शिथिल करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम

By

Published : May 1, 2019, 7:58 PM IST

पुणे- लोकसभा निवडणूक प्रक्रिया संपलेली नसल्याने अजूनही आचारसंहिता लागू असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे. मात्र, पाणीटंचाई निवारण कामासाठी आचारसंहिता आधीपासूनच शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे या कामांच्या मंजुरीसाठी कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

यासंदर्भात एक प्रसिद्धपत्रक काढण्यात आले आहे. सध्या देशात लोकसभेची निवडणूक सुरू असल्याने आदर्श आचारसंहिता लागू आहे. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याने आचारसंहिता शिथिल करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अन्य कामांसाठी आदर्श आचारसंहिता शिथिल करण्यासंदर्भात कोणतीही सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेली नाही, असेही नवलकिशोर राम यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details