पुणे - दौंड तालुक्यातील खुटबाव येथील शेतामध्ये वीज पडल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतल्याची घटना आज सायंकाळी ४.०० वाजण्याच्या सुमारास घडली. परंतु लगेच पावसाला सुरुवात झाल्याने नारळाच्या झाडाला लागलेली आग विझली.
...अन् नारळाच्या झाडानं घेतला पेट
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात खुटबाव येथील शेतामध्ये वीज पडल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतल्याची घटना आज घडली. परंतु लगेच पावसाला सुरुवात झाल्याने नारळाच्या झाडाला लागलेली आग विझली.
आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यात ढगाळ वातावरण झाले होते . तसेच जोरदार वारे वाहत होते . या वातावरणात अचानक खुटबाव येथील तुळशीराम गुलाब थोरात यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर वीज पडली. वीज पडल्याने या झाडाने पेट घेतला होता. परंतु थोड्याच वेळात पाऊस आल्यानंतर नारळाच्या झाडाला लागलेली आग विझली.
अवकाळी पावसाने दौंड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले. अगोदरच कोरोना व्हायरसने त्रस्त असलेले शेतकऱ्यांना या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा फटका सहन करावा लागणार आहे.
TAGGED:
Daund_lighting_struck