पुणे- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज प्रथमच एकविरा मातेचे सह कुटुंब दर्शन घेतले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह घेतले एकविरा देवीचे दर्शन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ११.२० च्या सुमारास एकविरा गडावर सहपरिवार हेलिकॉप्टरने दाखल झाले होते. यावेळी राज्याच्या सुख समृद्धीसाठी देवीला साकडे घातले. मात्र, देवी मातेचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ११.२० च्या सुमारास एकविरा गडावर सहपरिवार हेलिकॉप्टरने दाखल झाले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या सुख समृद्धीसाठी देवीला साकडे घातले. मात्र, देवी मातेचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. दरम्यान, उद्धव ठाकरे हे कार्ला गडावरून शिवनेरी किल्ल्यावर पोहोचणार आहेत. उद्धव ठाकरे शिवेनरी किल्ल्यावर नतमस्तक होण्यासाठी जाणार असून येथे राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहेत. यावेळी एकविरा गडावर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता.
हेही वाचा-पुण्यातील शेतकऱ्याने सुरू केला खेकडे पालनाचा व्यवसाय