महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कारागृह हे जबाबदार नागरिक घडवणारे संस्कार केंद्र व्हावे - मुख्यमंत्री ठाकरे - पुणे येरवडा कारागृह पर्यटन न्यूज

राज्यात 'कारागृह पर्यटन' ही अभिनव संकल्पना राबवण्यात येत आहे. या पर्यटन उपक्रमाचा शुभारंभ 26 जानेवारी च्या निमित्ताने पुण्यातल्या 150 वर्ष जुन्या एवढा कारागृहातून करण्यात आला. या वेळी, मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन माध्यमातून उद्घाटन करत मनोगत व्यक्त केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे ऑनलाईन पद्धतीने गोंदियातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

पुणे येरवडा कारागृह पर्यटन न्यूज
पुणे येरवडा कारागृह पर्यटन न्यूज

By

Published : Jan 26, 2021, 7:12 PM IST

पुणे -तुरुंगात असणारे कैदी हे एक मोठे मनुष्यबळ आहे. काहींच्या आयुष्याची गाडी भरकटते आणि ते येथे येतात यातील काहींची गाडी रुळावर कशी आणता येईल, यासाठी तसेच, दिशा भरकटलेली माणसे योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. येरवडा कारागृह हे जबाबदार नागरिक घडवणारे संस्कार केंद्र व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात कारागृहाचे विशेष महत्त्व - पवार

राज्यात 'कारागृह पर्यटन' ही अभिनव संकल्पना राबवण्यात येत आहे. या पर्यटन उपक्रमाचा शुभारंभ 26 जानेवारी च्या निमित्ताने पुण्यातल्या 150 वर्ष जुन्या एवढा कारागृहातून करण्यात आला. या वेळी, मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन माध्यमातून उद्घाटन करत मनोगत व्यक्त केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे ऑनलाईन पद्धतीने गोंदियातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

हेही वाचा -येरवडा जेल टुरिझममध्ये गांधी यार्ड, टिळक यार्ड, फाशी यार्ड पाहता येणार

''जेल यात्रा' - पर्यटनाचा एक नवीन मार्ग'

मुख्यमंत्र्यांनी भाषणात बोलताना 'तुरुंग पर्यटन' संकल्पनेवर भाष्य केले. आपल्याकडे पूर्वी 'जेलभरो आंदोलन' असायचे. लोक आंदोलनाला तयारीने यायचे. पोलीस त्यांना अटक करायचे आणि नंतर सोडून द्यायचे. पण आता 'जेल यात्रा' हा नवीन प्रकार आहे. लोक महाबळेश्वरला, लोणावळ्याला जाऊन आलो, असे सांगतात. मात्र, आता 'जेल'मध्ये जाऊन आलो, असेही सांगतील. पण 'जेलमध्ये जाऊन येतो' म्हणजे गुन्हा करण्याची गरज नाही. आपण 'जेल यात्रा' हा पर्यटनाचा एक नवीन मार्ग दाखवला आहे, असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.

भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात कारागृहाचे विशेष महत्त्व

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारागृह पर्यटन या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. येरवडा कारागृहात कैद्याची मानसिकता बदलण्यासाठी विविध उपक्रम केले जातात, असे सांगत त्यांनी या कारागृहात असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कारागृहातून मीनाताई ठाकरे यांना दिलेल्या पत्राचे वाचन देखील केले. भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात कारागृहाचे विशेष महत्त्व आहे. या कारागृहात स्वातंत्र्यसंग्रामातील आणि थोर नेते बंदिस्त होते. त्यामुळे या कारागृहाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, कारागृह पर्यटन ही संकल्पना समोर आणली असल्याचे पवार म्हणाले.

हेही वाचा -येरवडा तुरुंगामधून देशातील पहिल्या 'जेल टुरिझम' उपक्रमाला सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details