पुणे - आज राज्यभर उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती शिवजन्मोत्सव सोहळा साजरा झाला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर शिवभक्त म्हणून किल्ले शिवनेरीवर आलो आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपलाही डिवचल्याचे पाहायला मिळाले.
दूर राहून इतकी वर्ष वाया घालवली
जनतेला अपेक्षीत सरकार आल्यामुळे, आज ही गर्दी दिसत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किल्ले शिवनेरी गडावरून भाजपलाही डिवचले. आम्ही तिघांनी इतके दिवस दूर राहून एवढी वर्ष वाया घालवली. मात्र, आता आम्ही तीनही पक्ष एकत्र आलो आहोत. सर्व चांगले होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.