पुणे -योग्य वेळेला महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातात आली असून, घड्याळवाले माझे पार्टनर असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. येणाऱ्या काळात शेतीसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करणार असून, राज्यातील शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राजकारणातील मतभिन्नता हा वेगळा विषय असून, चांगल्या कामचा धिक्कार करणे म्हणजे करंटेपणा आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात पवार कुटुंबीयांचे असणारे योगदान नाकारता येणार नसल्याचेही ते म्हणाले.
'कृषिक महोत्सव २०२०' या महोत्सवाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बारामतीत उद्धाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादा भुसे, अभिनेता आमिर खान, आमदार रोहित पवार, आमदार विश्वजीत कदम यांच्यासह मोठ्या संख्यने शेतकरी वर्ग उपस्थित होता. यावेळी बोलतना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांनी नव-नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. नवीन बदल करुन कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे म्हटले.
इथे आलो नसतो तर मोठ्या अनुभवाला मुकलो असतो