महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

छत्रपती शिवाजी महाराजांचे तेज संपूर्ण जगात पसरवणार- मुख्यमंत्री ठाकरे - Hindavi Swaraj and the Maratha Empire

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज किल्ले शिवनेरीवर शिवजयंती साजरी झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांचे तेज पसरवणार असल्याचा मानस व्यक्त केला. छत्रपतींनी लढण्याची प्रेरणा जिद्द आम्हाला दिली, कोरोना संकटात ही प्रेरणा आम्हाला मिळते आहे. कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल असल्याचेही ते म्हणाले.

shivneri fort
छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती

By

Published : Feb 19, 2021, 1:42 PM IST

पुणे -आपल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवरायांचे अढळ स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. सध्या वातावरण चांगले आहे, पण तोंडावर मास्क आहे.
छत्रपती दैवत का आहे, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्याकडे होती. कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत, असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जगात शिवरायांचे तेज पसरवणार असल्याचा मानस व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे तेज संपूर्ण जगात पसरवणार

आज स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती देशात साजरी केली जात आहे. सरकारच्या वतीनेही किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, खा. छत्रपती संभाजीराजे, खा. डॉ.अमोल कोल्हे, उपस्थित होते.

'शिवयोग' या टपालाच्या विशेष आवरणाचे अनावरण-

सकाळी मुख्यमंत्र्यांचे शिवनेरीवर आगमन झाले त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी आदिवासी पारंपरिक नृत्य सादरीकरण झाले. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे, उप मुख्यमंत्री पवार यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी 'शिवयोग' या टपालाचे विशेष आवरण (कव्हर) अनावरण तसेच वन विभागाच्या माध्यमातून 391 वृक्षांच्या रोपणांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती

शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल-

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शिवनेरीवर येण्याचे हे दुसरे वर्ष आहे, हा बहुमान शिवरायांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने लाभला आहे. मनात, ह्रदयात शिवरायांचे स्थान अढळ आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. सध्या वातावरण चांगले आहे, पण तोंडावर मास्क आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरू आहे. छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, हे विसरू नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी महाराष्ट्रातील जनतेला दिला.

छत्रपती दैवत का आहे, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत. संपूर्ण जगात शिवरायांचे तेज पसरवणार, असे सांगून त्यांनी यावेळी पुरस्कारप्राप्त शिवभक्तांचेही अभिनंदन केले.

मुख्यमंत्री ठाकरे शिवनेरीवर

ABOUT THE AUTHOR

...view details