शिंदे गटाचा उत्साह शिगेला पुणे:येणाऱ्या महानगरपालिका विधानसभामध्ये आम्हाला भरपूर यश मिळेल आणि काम करणाऱ्या माणसाच्या मागे देवच नाही तर कायदा सुद्धा असतो हे आज सिद्ध झाले. आतापासून आम्ही शिवसेनेचे, बाळासाहेबांचे विचार तळागाळात शिवसेना वाढवण्यासाठी काम करू. आमची निष्ठा यातून सिद्ध होत असल्याचे पक्ष कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
शिंदे समर्थकांचा जल्लोष: पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेनेचे जे नवीन कार्यालय झाले त्या ठिकाणीसुद्धा कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करून, पेढे वाटून आनंद साजरा केला. पुण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खरेतर खूप समर्थन मिळाले. शिवसेनेचे मूळ असलेले विजय बापू शिवतारे, शिवाजीराव आढळराव पाटील, नाना भानगिरे, किरण साळी असे कार्यकर्ते शिंदे सोबत जाणार असल्यात मान्य केले. त्यांच्या पक्षाचे काम सुरू केले. त्यानंतर आता त्यांना हे सर्व चिन्ह आणि धनुष्यबाण मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण झाला आहे. खरी शिवसेना आमचीच आहे हा आम्हाला विश्वास होता आणि बाळासाहेबांच्याच विचाराने पुढे नेत आहोत. निवडणूक आयोगाने खऱ्या शिवसैनिकाला हे चिन्ह आणि नाव दिले, अशा प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
जाणून घ्या घटनाक्रम: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना कुणाची हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाकडे सर्व माहिती देण्याची निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना विनंती केली होती. शिवसेना आणि धनुष्यबाने चिन्ह घोटून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना अशी दोन नावे दिले होते. दोन वेगवेगळे चिन्हसुद्धा दिले होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मशाल आणि बाळासाहेबांची शिवसेना जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्व करतात त्याला ढाल तलवार दिली होती. परंतु आता त्याची सुनावणी निवडणूक आयोगाकडे होत होती. निवडणूक आयोगाने आज मात्र शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण ते एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. त्याचबरोबर शिवसेना हे पक्षाचे नाव सुद्धा एकनाथ शिंदे गटाला देण्यात आले आहे.
ठाकरे गटात नाराजी:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात मोठा आनंद आणि जल्लोष साजरा केला जात आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात या निकालामुळे निराशा पसरली आहे. हा पैशाने खरेदी केलेला विजय असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
शिंदे गटाच्या आमदारांचा जल्लोष - केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे गटाने जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला. आमदार संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल यांनी आपापल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांसह फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला. हा विजय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मात्र हा निर्णय दबावाखाली घेण्यात आला असून, आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू असा इशारा दिला आहे.
औरंगाबादेत कार्यकर्त्यांचा जल्लोष - केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी कार्यकर्त्यांसह उस्मानपुरा येथील त्यांच्या कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष साजरा केला. तर आमदार प्रदीप जैस्वाल यांनी गुलमंडी येथे कार्यकर्त्यांसह आनंद व्यक्त केला. राज्यात व्यापारीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिंदुत्व सोडण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र सत्ता नाही तर शिवसेना प्रमुखांचे विचार महत्वाचे आहेत. त्यांच्यामुळे शिवसैनिक मोठ्या पदावर गेला. त्यांनी पूर्ण आयुष्य आमच्यासाठी दिलं स्वतःसाठी कधी काही मागितला नाही. शिवसैनिक त्यांच्यासाठी सर्वस्व होते. त्यांना त्रास देणाऱ्याला ही चपराक बसेल. आम्हाला काही नको, आम्हाला फक्त विचार घेऊन पुढे जायचंय असं मत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी जल्लोष करताना व्यक्त केलं.
बुलडाणा जिल्ह्यात जल्लोष: शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष मिळाल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यात शिंदे गटाकडून जोरदार जल्लोष केला. आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला देण्यात आले आहे. त्याचा जल्लोष जिल्ह्यात आता शिवसेनेकडून साजरा करण्यात आला. बुलडाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार जल्लोष पार पडला. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे दोन्ही गोष्टी 'ऑन मेरिट' आम्हाला दिले आहे. हा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मातोश्रीला बंद केले आहे. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो आणि आज आमदार, खासदार यांच्या मेरिटच्या आधारावर निवडणूक आयोगाने आम्हाला मोठा दिलासा दिला आहे.
ठाकरे गटाचा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मानस:केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे गटाने जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला. आमदार संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल यांनी आपापल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांसह फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला. हा विजय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मात्र हा निर्णय दबावाखाली घेण्यात आला असून आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू असा इशारा दिला आहे.
ठाण्यात भगवा फडकवून आनंदोत्सव: अखेर हा सत्याचा विजय झाला, हिंदुत्वाचा विजय झाला, खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचा विजय झाला आहे. अशी मार्मिक प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र शिंदे गटाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. शुक्रवारी निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याबद्दल टेंभी नाक्यावरील आनंद मठात भगवा फडकवत पेढे भरवत जल्लोष साजरा केला. यावेळी जात, गोत अन् धर्म आमचा शिवसेना.. हे प्रसिध्दी असलेले गीत पुन्हा एकदा डिजे च्या तालावर वाजवून शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला.
हेही वाचा:Narhari Zirwal on Rahul Narwekar: नार्वेकरांची निवड माझ्या देखरेखीखाली योग्य, तर उपाध्यक्षपद अयोग्य कसे, झिरवळांचा सवाल; नार्वेकरांनीही दिले प्रत्युत्तर