पुणे : पुण्यातील नवले ब्रिज येथे रात्री टँकरच्या धडकेने झालेल्या अपघातात ( Accident on Navale bridge in Pune ) अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त झाली. या अपघाताची माहिती कळताच तो नक्की कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला ते शोधण्याचे तात्काळ निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
नवले ब्रिज येथे झालेल्या अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातामुळे सदर भागात झालेल्या वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही. याची दक्षता घेण्याचे निर्देश देखील वाहतूक पोलिसांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी ट्विट केले आहे. ( Navale Bridge Accident )