महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीत काय कलम ३७० लागू आहे का? - मुख्यमंत्री - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बारामतीत काय कलम ३७० लागू आहे का? देशात लोकशाही असून, प्रत्येक पक्षाला सभा घेण्याचा अधिकार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीवर टीका

By

Published : Sep 15, 2019, 12:51 PM IST

पुणे -बारामतीत काय कलम ३७० लागू आहे का? देशात लोकशाही असून, प्रत्येक पक्षाला सभा घेण्याचा अधिकार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा बारामतीत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती.

शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे पुणे जिल्ह्यात आगमन झाले. यात्रा बारामतीत आली असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्यावर आज बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की बारामतीत काय कलम ३७० कलम लागू आहे काय? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच तुम्ही आमच्या गावात या आम्ही तुमचे स्वागत करु असेही ते म्हणाले. आमच्या कार्यकर्त्यांनी पवारसाहेबांच्या सभेत जाऊन नारेबाजी केली तर चालेल का? असा सवालही त्यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details