पुणे - पिंपरी-चिंचवड येथील देहूरोड परिसरात असणाऱ्या कपड्याच्या दुकानातून कोयत्याचा धाक दाखवून पाच आरोपींनी पॅन्ट आणि शर्ट असे एकूण 25 हजारांचे कपडे लंपास केले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. याप्रकरणी देहूरोड पोलीस तपास पूर्ण केला. गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सण साजरा करण्यासाठी लुटले कपड्याचे दुकान हे आहेत आरोपी
ऋषीकेश उर्फ शेऱ्या राजू अडागळे (वय-20 रा.उर्से, मावळ), विजय उर्फ मुया राजु पिल्ले (वय-22 वर्षे, रा. आंबेडकर नगर, देहुरोड), अल्बर्ट सायमन जोसेफ (वय 20 वर्षे, रा. एम.बी. कॅम्प देहरोड), अतिष उर्फ गोड्या अनिल शिंदे (वय-19 वर्षे, रा. श्रीनगर, देहुरोड), राहुल संजय टाक (वय-20 वर्षे, रा. एम बी कॅम्प, देहुरोड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
कोयत्याचा दाखवला धाक -
देहूरोडच्या मुख्य बाजारातील पेठेत प्रदीप ड्रेसेस आणि ट्रेंड सेंटर नावाचे कपड्याचे दुकान आहे. चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवत दुकानातून प्रत्येकी 10 हजार आणि 15 हजार किंमतीचे शर्ट, पॅन्ट चोरून नेले. शिवाय आरोपींनी दुकानदारांना शिवीगाळ करत धमकी दिली. दुकानदाराने आरोपी विरोधात तक्रार नोंदवली दिली. त्यानुसार देहूरोड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. दरम्यान, देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि गुन्हे शाखा युनिट पाचचे कर्मचारी, अधिकारी आरोपींचा शोध घेत होते.
अखेर बेड्या ठोकल्या -
दरम्यान गुन्हे शाखेला निगडी येथील ओटा स्कीम इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आरोपी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी पाच मजली इमारत गाठली. इमारतीवर अल्पवयीन मुलांसह 20 ते 25 जणांची टोळी होती. त्यातून पाच आरोपींना बाहेर काढून अटक करण्यात आली. दिवाळी सण साजरा करण्यासाठी चोरी केली असल्याचे आरोपींनी सांगितले.