पुणे - सततच्या संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. पावसामुळे या भागातील टोमॅटो पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आधीचा दुष्काळ आणि आता सुरू असलेला संततधार पावसामुळे येथील बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.
जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरुर आणि खेड हे तालुके टोमॅटो उत्पादनात अग्रेसर तालुके म्हणून ओळखले जातात. या ठिकाणची नारायणगाव बाजारपेठ ही टोमॅटो विक्रीची प्रसिद्ध बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतून जगभरात टोमॅटो पाठवला जातो. मात्र, हाच टोमॅटो पाऊस व वातावरणातील बदलामुळे पडलेल्या रोगराईचा शिकार बनला आहे. त्यामुळे मोठा भांडवली खर्च करुन उभारलेली टोमँटो शेती संकटात आली असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.