पुणे- महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल विभागाच्या वतीने काही नवीन उपक्रम सुरू करण्यात आले असून महसूल विभागात सहजता कशी येणार तसेच पारदर्शकता कशी येणार यासाठी डिजिटलायजेशन करणे खूप महत्त्वाचे असते. कारण त्यामुळे नागरिकांना सहजपणे त्यांची कागदपत्रे उपलब्ध होत असतात. यातील महत्त्वाचे कागदपत्र कोणते असेल तर ते सातबारा आणि आत्ता नवीन डिजिटल युगात या सर्व सातबाराचे नव्या रुपात डिजिटलायजेशन करण्यात आले असून आत्ता नागरिकांना नव्या रुपात सातबारा मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त डिजिटल स्वाक्षरीत फेरफार वितरण व सुधारित नमुन्यातील सातबारा फेरफार वितरण व सुधारित नमुन्यातील सातबारा वितरण आणि महसूल नोंदणी व मुद्रांक विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते इ-मिळकत पत्रिका ऑनलाइन फेरफार प्रणाली दस्त नोंदणी प्रक्रियेशी संलग्न करणे या महसूल विभागाच्या नवीन ऑनलाइन सुविधांचा शुभारंभ करण्यात आले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढील काळात सातबारा सोबत फेरफार संगणीकृत पद्धतीने उपलब्ध करून देणार
नागरिकांना सेवा सहज व जलद गतीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कायद्यामध्ये बदल करावे लागतात. त्याच बरोबर काही कायदे रद्द करावे लागतात. आजपासून नागरिकांना नवीन स्वरूपात सातबारा करून देण्यात आलेला आहे. पुढील काळात विभागाच्या वतीने सातबारा सोबत फेरफार संगणीकृत पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे. विभागाने अधिकचे चांगले काम करून नागरिकांना जलद गतीने उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे. तसेच येत्या काळात राज्यव्यापी इ-पीक पाहणी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये संपूर्ण पिकांच्या नोंदणी शेतकऱ्यांच्या मदतीने घेण्यात येणार आहे, असेही यावेळी थोरात यांनी यावेळी सांगितले.
याआधी ते म्हणाले होते मी पून्हा येईल पण आले नाही ना
राज्यात मागील वर्षे आणि आत्ताही नैसर्गिक संकट आहे. असे असताना चक्रीवादळ, अतिवृष्टी सारखे संकट आले. अस असताना राज्य सरकारच्या वतीने मागच्या चक्रीवादळातही सरकारने मदत केली आणि आत्ताही करणार आहोत. मदत केलीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जी 26 कलमे सांगितली आहे. त्यातील त्यांनी किती कलमे त्यांच्यावेळेला वापरली हेही माहीत नाही. ते जे म्हणत आहे ते तपासून पाहावं कारण ते या आधीही म्हणाले होते की मी पून्हा येईल पण आले नाही, असे म्हणत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
हेही वाचा -पुण्यात भरदिवसा गोळ्या घालून सराईत गुन्हेगाराची हत्या