क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिकांचा गोंधळ; महानगर पालिका सुविधा देत नसल्याचा आरोप - pune municipal corporation lateat news
हा सर्व प्रकार सामाजिक कार्यकर्ते मनोज कांबळे यांनी समोर आणला आहे. दोन दिवसांपूर्वी देखील नागरिकांनी असाच बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी समजावून त्यांना पुन्हा गैरसोय होणार नाही म्हणून गप्प केले, अस तेथील नागरिकांनी सांगितले आहे. परंतु, या गोंधळामुळे अनेक जणांनी गर्दी केली असून सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला आहे.
महानगर पालिका सुविधा देत नसल्याचा आरोप करत क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिकांचा गोंधळ
पुणे- क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या शेकडो नागरिकांनी महानगर पालिका प्रशासन सुविधा पुरवत नसल्याचा आरोप करत गोंधळ घातला. ही घटना आज दुपारी पिंपरी-चिंचवडमध्ये घडली असून नागरिक बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, गेटला कुलूप असल्याने त्यांना बाहेर पडता आलं नाही. दरम्यान, महानगर पालिकेच्या प्रशासनाने त्यांना वेळेवर जेवण मिळत आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे.
TAGGED:
pune latest corona update