बारामती (पुणे) - महावितरणची थकबाकी वसूली मोहिम आता कोरोना संक्रमित रूग्णांच्या घरापर्यंत पोहचली आहे. व्यक्ती कोरोनाग्रस्त असतांना देखील मुदत न देता थकबाकी न भरल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. त्यामुळे आधीच कोरोनामुळे बिकट असताना महावितरणच्या भूमिकेमुळे हतबल झाल्याचे कोरोनाग्रस्त परिवाराचे मत आहे.
मागील काही दिवसांपासून महावितरणची थकबाकी वसूलीची मोहिम तीव्रपणे सुरू आहे. सर्वसामान्य कष्टकरी वर्गापासून ते अगदी शेतकरी, कारखानदार, लघू उद्योजकांकडून वीज बिलाची वसूली करण्यात येत आहे. उन्हाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर थकबाकी वसूलीची मोहिम तीव्र झाली होती. सर्वच स्तरातून महावितरणच्या या भूमिकेला विरोध झाल्यानंतर याचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनात देखील उमटले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत वीज तोडण्यात येणार नाहीत, अशी ग्वाही दिली होती. मात्र त्यानंतर महावितरणने देखील ‘वीज तोडून नाही तर हात जोडून करणार वसुली’ अशी मोहिम हाती घेतली होती. मात्र हे सौजन्य केवळ दिखाव्या पुरतेच होते की काय ? असा सवाल बारामती शहर व तालुक्यातील कोरोनाग्रस्त परिवार करत आहे.
तरीही कारवाई
'आमच्या घरातील चार व्यक्ती सध्या कोरोनाग्रस्त आहेत. त्यापैकी तीन जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एकाला वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने घरी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आमची वीजबिलाची काही रक्कम थकित आहे. ज्यावेळी महावितरणचे पथक घरी वीज पुरवठा तोडण्यासाठी आले. त्यावेळी आम्ही परिस्थिती त्यांना सांगितली. तसेच कोरोनापासून मुक्त झाल्यानंतर दोन टप्प्यामध्ये आपले थकित वीज बिल भरण्याची तयारी देखील दर्शवली. मात्र आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने वीजजोड तोडत आहोत. असे उत्तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिले',अशी माहिती राजेश मत्रे यांनी दिली आहे.
..'तर पुन्हा वीज जोडणी केली'
'माणूसकीच्या दृष्टीने आम्ही थकित वीजबिल असलेल्या कोरोनाग्रस्त रूग्णाच्या घरची वीज तोडू नयेत, अशा सुचना देल्या आहेत. असा एक प्रकार समोर आला होता. मात्र त्या कुटूंबाची पुन्हा वीज जोडण्यात आली आहे.' अशी माहिती बारामतीचे उपअभियंता प्रकाश देवकाते यांनी दिली.
बारामतीत महावितरणच्या 'वीज तोड' मोहीमेवर नागरिकांचा आक्षेप - बारामती महावितरण
सर्वच स्तरातून महावितरणच्या या भूमिकेला विरोध झाल्यानंतर याचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनात देखील उमटले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत वीज तोडण्यात येणार नाहीत, अशी ग्वाही दिली होती. मात्र त्यानंतर महावितरणने देखील ‘वीज तोडून नाही तर हात जोडून करणार वसुली’ अशी मोहिम हाती घेतली होती. मात्र हे सौजन्य केवळ दिखाव्या पुरतेच होते की काय ? असा सवाल बारामती शहर व तालुक्यातील कोरोनाग्रस्त परिवार करत आहे.
ऊर्जाभवन