पिंपरी (पुणे) -न्यू इअर सेलिब्रेशन करण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी व्हेज, नॉनव्हेज बिर्याणीला पसंती दिली आहे. ग्राहकांच्या रांगा बिर्याणी हाऊच्या पुढे लागलेल्या दिसतात. परंतु, दरवर्षीचा तुलनेत यावर्षी काही प्रमाणात गर्दी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच बिर्याणीचे दर ही शंभर रुपयांनी वाढल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे.
पिंपरीत न्यू इअर सेलिब्रेशन चिकन, मटण सोबत बिर्याणीची चंगळ!31 डिसेंबर म्हटलं की, चिकन, मटण, बिर्याणी आणि हॉटेल्समध्ये जाऊन जेवायला प्लॅन असतो. पिंपरी-चिंचवडकरांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील बिर्याणीला पसंती दिली आहे. मात्र कोरोनामुळे बाहेर गर्दीचं प्रमान कमी आहे. नारीकांनी घरच्या जेवणाला पसंती दिली आहे. तसेच आज गुरुवार असल्याने अनेकांनी व्हेज बिर्याणीची ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळत आहे.
बिर्याणीवर ताव मारत घरातच न्यू इअर सेलिब्रेशन-2020 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नागरिकांकडून नियम पाळून नव वर्षाच स्वागत केलं जातं आहे. दिवसभर मनसोक्त भटकंती करून घरातच बिर्याणीवर ताव मारून न्यू इअर सेलिब्रेशन करण्याचं नागरिकांनी ठरवलं आहे. त्यामुळेच अनेकांनी बिर्याणीची ऑर्डर दिलेली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ग्राहक कमी; शंभर रुपयांनी दरही वाढलेगेल्या वर्षी बिर्याणी ऑर्डर करणाऱ्यांची संख्या जास्त होती. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता नागरिक बाहेरच खाण्यास पसंती देत नाहीत. याचा काही प्रमाणात फटका बीर्याणी हाऊसला बसला असल्याचं बिर्याणी हाऊस चालक आरिफ यांनी सांगितलं आहे. तर, शंभर रुपयांनी बिर्याणीचे दर वाढले असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.