वाकडमध्ये सोसायटीच्या नागरिकांची बिल्डरकडून फसवणूक; पैसे भरूनही गैरसोय - PIMPRI
प्रत्येक महिन्याला तब्बल ४ हजार रुपये साफसफाईसाठी घेतले जातात. मात्र, कोणत्याही प्रकारची सुविधा आणि साफसफाई सोसायटीमध्ये केली जात नाही.
ओमेगा सिटी सोसायटीतील रहिवासी
पुणे- पिंपरी चिंचवड शहरातील वाकड या परिसरात बिल्डरकडून फसवणूक होत असल्याचा आरोप तेथील नागरिकांनी केला आहे. वाकडमधील ओमेगा सिटी नावाची सोसायटी असून या सोसायटीत पाण्यासाठी आणि साफसफाईसाठी पैसे देऊनही सुविधा दिल्या जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
ओमेगा सिटीमध्ये एकूण १८८ घर आहेत. तसेच फेज १ आणि २ या भागात विभागली गेली आहे. घर घेताना बिल्डरने सोसायटीच्या पाठीमागे असलेली जागा ही सोसायटीची असल्याचे सांगितले. मात्र, आता बिल्डरने १ गुंठाचा ही जागा परस्पर विकून टाकली. यामुळे येथील महिलांनी सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत बिल्डरने फसवणुक केलाचा आरोप नागरिकांनी केला आहे. या व्यवहारात सोसायटीचे चेअरमन याचा देखील सहभाग असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. तसेच, १८८ घरांमधून प्रत्येक महिन्याला तब्बल ४ हजार रुपये साफसफाईसाठी घेतले जातात. मात्र, कोणत्याही प्रकारची सुविधाआणि साफसफाई सोसायटीमध्ये केली जात नाही. याबाबत चेअरमन बी. भाटिया यांच्याकडे तक्रार केली तरीदेखील कोणत्याही प्रकारचा दुजोरा त्यांच्याकडून दिला जात नसल्याचे यावेळी सोसायटीच्या नागरिकांनी सांगितले.
याबाबत सोसायटी चेअरमन बी. भाटिया तसेच बिल्डर एम. सिंग यांच्याशी संवाद साधन्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.