महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'बॅलेट पेपरवरील मतदानावर नागरिकांचा विश्वास, केंद्राने जनभावनेचा आदर करावा'

जनतेतून बॅलेट पेपरवर मतदान करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे लोकशाहीतील या व्यवस्थेवर नागरिकांकडून विश्वास व्यक्त केला जात असताना, केंद्र सरकारने बॅलेट पेपरवरील मतदानाकडे लक्ष देऊन जनभावनेचा आदर करायला हवा, असे मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

By

Published : Dec 5, 2020, 6:51 PM IST

nana patole
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

पुणे(आळंदी) - राज्यात नुकत्याच विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला होता. लोकशाहीमधील व्यवस्थेमध्ये आपले मत कुठे जाते हे समजून घेण्याचा अधिकार त्या मतदाराला असतो आणि आताच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी केलेले मतदान योग्य ठिकाणी गेले असून, ते विधानपरिषदेच्या निकालावरून सिद्ध होते. त्यामुळे जनतेतून बॅलेट पेपरवर मतदान करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे लोकशाहीतील या व्यवस्थेवर नागरिकांकडून विश्वास व्यक्त केला जात असताना, केंद्र सरकारने बॅलेट पेपरवरील मतदानाकडे लक्ष देऊन जनभावनेचा आदर करायला हवा, असे मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

बॅलेट पेपरचा वापर करण्याबाबत केंद्राने विचार करावा

केंद्र व राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये झालेल्या मतदानावर अनेकवेळा प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. यावेळी सत्ताधारी व विरोधकांनी ईव्हीएमवरील मतदानावर आक्षेप घेत ईव्हीएम मशीनवर घोटाळा केला जातो अशाही चर्चा अनेकवेळा करण्यात आल्या. मात्र, राज्यात नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानावर जनमताने दिलेला कौल मान्य करत पुढील काळामध्ये जनभावनांचा आदर करून पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचा विचार केंद्र सरकारने करावा, असे मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

हेही वाचा -आळंदीच्या वैभवाचा संजीवन समाधी सोहळा सुरळीत पार पडावा - नाना पटोले

पदवीधर शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवरील सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला. यामध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्यानंतर हा विजय बॅलेट पेपरवरील मतदानावर जनभावनेचा टाकलेला विजय असून, पुढील काळामध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर करण्याचा विचार केंद्र सरकारने करून जनभावनांचा आदर करावा, असे मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details