पुणे - उर्फी प्रकरणावरून ( Urfi case ) महिला आयोगाला टार्गेट केले म्हणून रूपाली चाकणकर ( Chitra Wagh Criticize Rupali Chakankar ) यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याचा आरोप केला होता. त्यात अनेक आरोप करण्यात आल्यानंतर आता चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी पत्रकार घेऊन हे सगळ्या आरोपाला उत्तर दिलेला आहे.
उर्फीचा नंगा नाच -रूपाली चाकणकर म्हणजे आयोगाचा अध्यक्ष म्हणजे आयोग नाही. त्यामध्ये इतर सात सदस्य असतात. त्यांची संमती घ्यावी लागते. मला नोटीस पाठवण्याच्या आधी तुम्ही राज्याचे पोलीस डिजी यांची परमिशन घेतली का? आयोग काय काम करतोय याची आधी आम्हाला कल्पना आहे. आम्ही काम केले. त्यामुळे मी म्हणजे आयोग या भ्रमात रूपाली चाकणकर याने राहू नये असे इशाराही त्यांनी दिलेला आहे. उर्फीचा नंगा नाच चाललेला आहे .तो आम्ही सहन करणार नाही. दिसेल तिथे फटकावणारच असे चित्रा वाघ म्हणाल्या.
राज्य महिला आयोगाचा माझ्यावर राग - यात राजकीय अकास काय आहे? राज्य महिला आयोगाने अकसा पोटी म्हणून माझ्यावर आरोप केले? जर महिला आयोग योग्य काम करत असतं तर, अजित दादा पवार जे म्हणाले की, आम्ही महिलांना संधी देतो. त्याचं सोनं करायचं का माती हे त्यांच्या हातात आहे. याची माती होत आहे हे अजित दादांच्या लक्षात आलेला आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळे या मोठ्या नेत्या आहेत. त्याने सुद्धा वादविवाद थांबवले पाहिजेत असे म्हटलेल आहे. त्यामुळे त्यांना चांगलं कळतं की कुठे थांबलं पाहिजे. पण यांना कसं कळत नाही हाच प्रश्न असल्याचेही त्या म्हणाले आहे.