पुणे :राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभर त्यांच्या विरोधात तीव्र यांनी अजब विधान केले आहे. चित्रा वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटील आणि हेमंत रासने यांची तुलना थेट महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी केली आहे. त्या आज पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होत्या.
चंद्रकांत पाटीलांची केली फुल्यांशी तुलना : यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, चंद्रकांत पाटील खूप चांगल बोलले. आज पहिल्यांदा एका महिलेला पाच पुरुषांनी ओवळले आहे. दादा नेहेमी काहीतरी परिवर्तन घडवत असतात. त्या निमित्ताने आज नवीन पायदंडा हा दादांच्या माध्यमातून घातला गेला आहे. मी नेहमी असे म्हणत असते की, पुणे हे स्त्री शक्तीचा आधार केंद्र आहे. जेवढ्या स्त्री शक्तीच्या चळवळी सुरू झाल्या त्या पुण्यातून सुरु झालेल्या आहे.आजची नवीन सुरवात देखील पुण्यातून झालेली आहे. आत्ता आम्हाला सवित्री या घरोघरी दिसायला लागल्या आहे. चंद्रकांत पाटील, हेमंत रासने यांच्या सारख्या जोतिबांच शोध जारी आहे. असे जोतिबांचा समाजात जास्तीत जास्त निर्माण व्हातील अशा मी कार्यक्रमाच्या माध्यमातून शुभेच्छा देते.
महिलांपुढे वेदना टिकत नाही :या कार्यक्रमात चित्रा वाघ म्हणाल्या की,स्त्रीच्या जातीला संघर्ष आहे. प्रवाहाच्या विरोधात पोहण्याची हिंमत स्त्रीयांमध्ये असते. जर स्त्रीयांना काय काय सहन करावं लागत आहे हे माला माहिती आहे. स्त्रीयांच्या शरिरात एक अदृश्य शक्ती आहे. बीपीची मोजण्याचे मशीन आहे. मात्र, पण बाईच्या आतमध्ये असलेल्या वेदना मोजायची मशिन अजून आलेलं नाही. असे मशिन जर बाजारात आले तर ते महिलांच्या वेदांनपुढे टिकू शकणार नाही. त्या मशिनच्या ठिकऱ्या-ठिकऱ्या होतील असे त्या म्हणाल्या.
सन्मान स्त्री शक्तीचा :पुण्यात आज नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मित्र परिवारतर्फे दरवर्षी स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवून उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांचे कार्य समाजासमोर यावे, या उद्देशाने सुरु केलेल्या सन्मान स्त्री शक्तीचा या सोहळ्यात यंदा सहा महिलांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यात लक्ष फाउंडेशनच्या अनुराधा प्रभुदेसाई, डीआरडीओच्या शास्त्रज्ञ कथिका रॉय, भरतनाट्यमृत्यांगना डॉ.स्वाती दैठणकर, ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, प्रकाशक सुनिता राजे पवार, मातृशक्ती संस्थेच्या नलिनी वायाळ यांचा या गौरव संमारंभात सहभाग होता.