महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ajit Pawar on Chinchwad By Election : चिंचवड पोटनिवडणुकीत 'वंचित'ने महाविकास आघाड़ीला पाठिंबा द्यावा- अजित पवार - वंचित बहुजन आघाडी

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक ही प्रतिगामी शक्तींना रोखण्यासाठी महत्त्वाची आहे. वंचित बहुजन आघाडीदेखील नेहमीच प्रतिगामी शक्तींच्या विरोधात ठाम उभी राहिली आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रतिगामी शक्तींना नामोहरण करण्यासाठी आपण महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पत्राद्वारे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांना केली आहे.

Ajit Pawar In Chinchwad By Poll Election
अजित पवार

By

Published : Feb 14, 2023, 10:16 PM IST

पुणे (पिंपरी-चिंचवड):सध्या चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक सुरू आहे. महाविकास आघाडीच्या वतीने विठ्ठल उर्फ नाना काटे हे निवडणूक लढवित आहेत. नाना काटे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रचारात आघाडी घेतली. महाविकास आघाडीतील सहभागी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह शेतकरी कामगार पक्षाने मोठी ताकद लावली आहे. याशिवाय नाना काटे यांना समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट), मातंग समाज व इतर अनेक पक्षांनी नाना काटे यांना पाठिंबा देत विजयी करण्याचा निर्धार केला.


चिंचवडची पोटनिवडणूक महत्त्वाची: याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांना विनंती पत्र पाठविले आहे. या पत्रात गव्हाणे यांनी म्हटले आहे की, चिंचवडची पोटनिवडणूक ही सर्वार्थाने महत्त्वाची आहे. प्रतिगामी शक्तींच्या ध्येय-धोरणांमुळे लोकशाही अडचणीत आली आहे. संविधान बदलण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत या शक्ती चालल्या आहेत. त्यांना रोखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्रतिगामी शक्तींना रोखण्यासाठी आम्ही सुरू केलेल्या लढ्यात आपल्यासारख्या सहकाऱ्यांनी सहभागी होणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपण एकत्र आल्यास हा लढा आणखी बळकट होईल.

गव्हाणे यांची मागणी :यामुळे आपण हा लढा यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या पाठीशी आपली ताकद लावावी व चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आपला पाठींबा द्यावा, अशी विनंती गव्हाणे यांनी केली आहे. गव्हाणे यांनी केलेल्या विनंतीला वंचितचा प्रतिसाद मिळाल्यास नाना काटे यांना मोठी ताकद मिळणार हे निश्चित आहे. तर विजय अधिक मोठा आणि सहज शक्य होणार आहे.

निवडणुका बिनविरोध नाहीच: पुणे जिल्ह्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुका या बिनविरोध होणार नाहीत, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे मिरी पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केल्यानंतर जाहीर सभेनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी हे स्पष्ट केले.

अजित पवार यांचे मोठे विधान:कसबा आणि पिंपर चिंचवडी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवार जाहीर केले जात आहेत. तर ही पोटनिवडणूक परंपरेनुसार बिनविरोध व्हावी असे देखील सांगितले जात आहे. मात्र राज्याचे विरोधी पक्षनेत अजित पवार यांनी कसबा-चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही, असे स्पष्ट विधान केले आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे मिरी पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार निलेश लंके, पक्षाचे राज्य सरचिटणीस प्रताप ढाकणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा:Air India Expansion Plan: एअर इंडियाचा मोठा प्लॅन.. एअरबसकडून 250 नवीन विमाने खरेदी करणार, फ्रान्ससोबत करार

ABOUT THE AUTHOR

...view details