अश्विनी जगताप यांचा 36 हजार 770 मतांनी विजय पुणे :भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप चिंचवड मतदारसंघात उमेदवारी दिली होती. निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, राष्ट्रवादीने निवडणूक लढविण्याचा निर्धार केल्याने मतदारसंघात रंगतदार लढत पहायला मिळाली. शिवाय उमेदवारीवरून राष्ट्रवादीतच बंडखोरी झाल्याने तिरंगी लढत झाल्याचे दिसून आले. बंडखोरीचा फटका राष्ट्रवादीला बसल्याने भाजपच्या अश्विनी जगताप यांचा 36 हजार 770 मतांनी विजय झाला. त्यांच्या विजयाची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांनी अक जल्लोष सुरु केला आहे.
अश्विनी जगताप चिंचवड पोटनिवडणुकीत विजयी सर्वसामान्य जनतेचा विजय : या विजयाबद्दल अश्विनी जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मी हा विजय सर्वसामान्य जनतेला, लक्ष्मण जगताप यांना समर्पित करते. माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल भाजप नेते, कार्यकर्ते, जनतेचे त्यांनी यावेळी अभार वक्त केले आहे. अशा पद्धतीने निवडणूक लढवावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते. लक्ष्मण जगताप यांची लोकांसाठीची अपूर्ण कामे मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, असे अश्विनी जगताप यांनी विजयानंतर सांगितले.
अश्विनी जगताप यांना उमेदवारी :चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत महायुतीच्या वतीने अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात अली होती. महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे नाना काटे यांना तर, शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यासह २८ उमेदवार रिंगणात होते.
राष्ट्रवादीला बंडखोरीचा फटका :राष्ट्रवादीतील बंडखोरीचा फटका नाना काटे यांना बसल्याचे दिसुन येत आहे. शिवसेना उमेदवार राहुल कलाटे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी महाविकास अघाडी विरोधात बंड पुकारले होते. त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवार अश्वीनी जगताप यांना झाला आहे. तर, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला या पोटनिवडणुकीत जोरदार फटका बसला आहे.
फुटीचा फायदा भाजपला :चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होती. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जोरदार लढत पहायला मिळाली. महाविकास आघाडीतील फुटीचा फायदा भाजपला झाला असून चिंचवडमध्ये ३७ व्या फेरीअखेर भाजपच्या आश्विनी जगताप या तब्बल ३६ हजार 770 मतांच्या फरकाने १ लाख ३५ हजार ४३४ मते मिळवून विजयी झाल्या.
३६ हजार मताधिक्याने विजयी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी बाजी मारली आहे. जगतात या ३६ हजारांच्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, बंडखोर राहुल कलाटे यांचा त्यांनी पराभव केला. चिंचवड पोटनिवडणूक ही सर्वच पक्षासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. त्यात, भाजपाने मुसंडी मारली आहे. हा विजय दिवंगत लक्ष्मण जगताप, जनतेला समर्पित करत असल्याचे अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी म्हटले आहे.
अपक्षाचा महाविकास आघाडील फटका : भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने चिंचवड पोटनिवडणूक लागली होती. जगताप कुटुंबातून अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. महाविकास आघाडीकडून नाना उर्फ विठ्ठल काटे, ठाकरे गटाचे बंडखोर राहुल कलाटे यांनी नशीब अजमावले. अगोदर ही निवडणूक तिरंगी होईल असे चित्र होते. परंतु, अपक्ष राहुल कलाटेंना वंचित व्यतिरिक्त इतर पक्षाचा पाठिंबा मिळाला नाही.
रंगदार लढत : महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे तर, भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे आदी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आज मतमोजणी झाली असून अखेरीस अश्विनी लक्ष्मण जगताप ३६ हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. त्या पहिल्या फेरीपासून आघाडीवर होत्या. काही ठिकाणी त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी टक्कर दिली. नाना काटे यांना ९९ हजार ३४३, राहुल कलाटे यांना ४४ हजार ८२ मते मिळाली आहेत.
हेही वाचा -Neelam Gorhe On Sanjay Raut : संजय राऊतांना सात दिवसांची मुदत; सभापती मागवणार खुलासा