पुणे - लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बहुमत मिळाले. त्यानिमित्ताने विविध संस्थांमधील चिमुकल्यांनी मोदींचे मुखवटे घालून केक कापला. तसेच पंतप्रधान मोदींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
चिमुकल्यांनी मोदींचे मुखवटे घालून कापला केक, पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा
इच्छाशक्ती असेल तर माणूस असाध्य गोष्टदेखील साध्य करू शकतो. असा संदेश विद्यार्थ्यांनी नरेंद्र मोदी यांच्या जीवनपटामधून घेऊन त्यातून प्रेरणा घ्यावी. यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जवळपास ८० चिमुकल्यांना साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट महानगर पालिकेजवळील मंगला थिएटर येथे दाखवण्यात आला. तसेच यावेळी नरेंद्र मोदी यांचे मुखवटे घालून केक कापत, लाडू भरवत त्यांना पुढील कारर्किदीसाठी शुभेच्छा दिल्या.
इच्छाशक्ती असेल तर माणूस असाध्य गोष्टदेखील साध्य करू शकतो. असा संदेश विद्यार्थ्यांनी नरेंद्र मोदी यांच्या जीवनपटामधून घेऊन त्यातून प्रेरणा घ्यावी. यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे पियुष शहा म्हणाले.