पुणे Child Abuse In Pune : श्रद्धेचं ठिकाण असलेल्या मशिदीमध्येच नराधमानं नमाज पठणासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली. मौहम्मद युसुफ असं त्या अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधमाचं नाव आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील कोंढवा इथं 10 नोव्हेंबर 2023 रोजी घडली आहे. याबाबत पीडिताच्या मामानं कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
नमाज पठणासाठी गेलेल्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार : याबाबत अल्पवयीन मुलाच्या मामानं कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मौहम्मद युसुफ (रा. कोंढवा) याच्या विरोधात लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण कायद्याच्या ( POCSO ) विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नराधमाविरोधात 15 नोव्हेंबर रोजी तक्रार देण्यात आली होती.
बदनामीच्या भीतीनं दिली नाही तक्रार :याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांची मावस बहीण ही कोंढवा येथील चेतन गार्डन इथं राहायला आहे. त्या आपल्या मावस बहिणीला भेटायला गेल्या असता, तिथं त्यांनी अल्पवयीन भाच्याला विचारलं की तू गेल्या काही दिवसापासून नमाजला का येत नाही. तेव्हा बहीण आणि नऊ वर्षाचा पीडित भाचा म्हणाला, की मी आणि माझा मित्र 10 नोव्हेंबर रोजी कोंढवा इथल्या मशिदीत नमाज पठणसाठी गेलो होतो. यावेळी नमाज झाल्या नंतर सर्व लोक गेल्यावर जे अजान देणारे आहेत, त्यांनी सांगितलं की नमाज कशी पढतात, हे मी तुम्हाला शिकवतो. यावेळी आरोपी तिथं आला आणि त्यानं पीडित अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्राला तो मशीदीत राहात असलेल्या त्याच्या खोलीत नेलं. तिथं त्यानं नमाज पठणाविषयी थोडी माहिती दिली. त्यानंतर त्यानं पीडिताच्या मित्राला जाण्यास सांगितलं. त्यानंतर त्यानं पीडित अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर पीडितानं घरी येऊन सारा प्रकार सांगितला. मात्र घरच्यांनी बदनामीच्या भीतीनं कोणालाही याबाबत सांगितलं नाही.
मामानं दाखल केली तक्रार :घडलेला प्रकार जेव्हा पीडिताच्या मामाला कळाला, तेव्हा त्यांनी तत्काळ याची दखल घेत पोलीस स्टेशन गाठलं. मामानं तक्रार दाखल केल्यानंतर कोंढवा पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :
- Minor Girl Gang Rape : मित्रानंच केला घात; चिमुरडीवर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार, चार जणांना अटक
- Minor Girl Rape : नातेवाईकावर विश्वास ठेवणं पडलं महागात; अल्पवयीन मुलीवर बलात्कार
- Rape On Student : माणुसकीला काळीमा! आश्रम शाळेतील विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार