पुणे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच किल्ले शिवनेरीवर येऊन गडावर नतमस्तक होणार आहेत. आजचा दौरा हा मुख्यमंत्र्यांचा कौटुंबिक दौरा आहे. यासाठी शिवनेरी गडावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी सांगितले.
किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री ठाकरेंच्या आगमनाची तयारी पूर्ण - शिवाजी आढळराव पाटील बातमी
राम मंदिराचा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर निर्णयाचे स्वागत करत शिवनेरीवर जाऊन नतमस्तक होणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहपरिवारासह मावळ मधील एकविरा देवी व किल्ले शिवनेरी या ठिकाणी येऊन दर्शन घेणार आहेत.
हेही वाचा-मुख्यमंत्र्यांचा भाजपला आणखी एक दणका; महामंडळावरील नियुक्त्या करणार रद्द?
राम मंदिराचा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर निर्णयाचे स्वागत करत शिवनेरीवर जाऊन नतमस्तक होणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहपरिवारासह मावळ मधील एकविरा देवी व किल्ले शिवनेरी या ठिकाणी येऊन दर्शन घेणार आहेत. मात्र, हा दौरा कौटुंबिक जरी असला तरी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे किल्ले शिवनेरी गडावर शेतकऱ्यांसाठी कुठले महत्वाचे निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
शिवसैनिकांनी गडावर तयारी पूर्ण केली आहे. आजच्या या दौऱ्याच्या निमित्ताने महाशिवआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना असे तीनही पक्ष पहिल्यांदाच एकत्र किल्ले शिवनेरीवर पाहायला मिळणार आहेत.