पुणे - पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेतील लसीकरण केंद्राचे उदघाटन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकार हे सगळे विषय केंद्रावर सोडून मोकळे होत आहे. जर सर्वकाही केंद्राने करायचे असेल, तर राज्य सरकार म्हणून तुम्ही काय करणार आहात, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांनी पीपीई किट घालून बाहेर पडावे -
गुजरात ने रेमडेसिवीर इंजेक्शन एक निर्माण करायला लागणारा 19 दिवसांचा कालावधी 4 दिवसांवर आणला. उत्तर प्रदेशमध्ये ऑक्सिजन बनवण्याचे केंद्र सुरू झाले आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजन केंद्र निर्माण करण्यासाठी असलेला निधी खर्चदेखील केलेला नाही, हे तुम्ही जनतेला केंव्हा सांगणार आहात, असा प्रश्न त्यांनी राज्य सरकारला केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीपीई किट घालून बाहेर पडावे आणि कारखानदाऱ्यांच्या भेटी गाठी कराव्या. फक्त केंद्रावर टीका करून काहीही होणार नाही, अशा सुचनाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केल्या.
महाविकास आघाडी सरकारने लसीकरणाचे राजकारण केले -