महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते बारामती कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन - उद्धव ठाकरेंच्या हस्ते बारामती कृषिक प्रदर्शनाचे उदघाटन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता अमिर खानसह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

Uddhav Thackeray Inauguration of Baramati Agricultural Exhibition
उद्धव ठाकरेंच्या हस्ते बारामती कृषिक प्रदर्शनाचे उदघाटन

By

Published : Jan 16, 2020, 4:21 PM IST

Updated : Jan 16, 2020, 7:14 PM IST

पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता आमिर खानसह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इको कारमध्ये बसवून प्रदर्शनाची सफर घडवली. यावेळी पवार यांनी ठाकरेंना कृषी प्रदर्शन 2020ची माहिती तसेच केव्हीकेमधील प्रयोगाची माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही इको कार स्वतः चालवत आपल्यासोबत मंत्री विश्वजित कदम, कृषीमंत्री दादा भुसे यांना प्रदर्शनाची माहिती दिली. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा बारामतीतील हा पहिलाच जाहीर कार्यक्रम झाला.

उद्धव ठाकरेंच्या हस्ते बारामती कृषिक प्रदर्शनाचे उदघाटन

शारदानगर येथील अँग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टद्वारे आयोजित कृषिक प्रर्दशनाचे उद्घाटन मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्यी हस्ते पार पडले. उद्घाटनानतंर ११० एकर क्षेत्रात उभारण्यात आलेल्या कृषी प्रर्दशनाची पाहणी केली. औषधी वनस्पती, शेतकऱ्यांच्या फायद्याचे शुगरबीट पीक, मक्यापासून मुरघास तयार करणे, मस्त्य पालनातून नायट्रेड व नायट्रॉडपासून विशमुक्त भाजीपाला कसा पीकवावा, अशा विविध प्रात्याक्षिकांची पाहणी केली. जगातील सर्वात लहान अडीज फुटी गाय, खिल्लार बैल, म्हैस, शेळी तसेच श्वानांच्या विविध प्रकारच्या जाती, आश्वांच्या विविध प्रकारांची मुख्यमंत्र्यांनी यावेळी पाहणी केली.

Last Updated : Jan 16, 2020, 7:14 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details