पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी गडावर आज (बुधवारी) शिवजन्मोत्सव साजरा झाला. यासाठी राज्यभरातून असंख्य शिवभक्त ढोल-ताशांच्या वाद्याच्या गजरात मशाल पेटवत शिवनेरी गडावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार. मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री दत्ता भरणे हेही किल्ल्यावरील शिवजयंती उत्सवाला उपस्थित होते.
किल्ले शिवनेरी गडावर ढोल-ताशांच्या गजरात शिवजयंती उत्सव; मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांची उपस्थिती हेही वाचा -...तर मुख्यमंत्र्यांना दालनात कोंडू, तृप्ती देसाईंचा इशारा
जयंती उत्सव साजरा होत असताना, प्रशासनाच्यावतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. या परिसरात शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तर, ढोल-ताशांच्या गजरात व तुतारीच्या निनादात शिवगर्जना दिली जात होती. शिवनेरी गडावर साजरा साजरा केल्या गेलेल्या उत्सवामध्ये प्रशासन व शिवभक्तांनी एकत्र काम केले.
किल्ले शिवनेरी गडावर ढोल-ताशांच्या गजरात शिवजयंती उत्सव; मुख्यमंत्र्यांची उपस्थिती हेही वाचा -नांदगावच्या शिक्षिकेची अनोखी शिवभक्ती, महाराजांचा पुतळा स्वच्छ करून दिवसाची सुरुवात