पुणे : शिवनेरीवर किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जुन्नर येथील छत्रपती संघर्ष संघाने मर्दानी खेळांचे सादरीकरण केले. हे चित्तथरारक मर्दानी खेळ पाहून उपास्थित मान्यवरांनी टाळ्याच्या गजरात या लहान मुलाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बाळशिवाजी, जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प वाहीले.
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण :कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात आले. ह.भ.प. नामदेव महाराज घोलप यांना मरणोत्तर शिवनेरी भूषण पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला. तसेच मंगेश चंद्रचूड, कोल्हे तसेच खेळाडू संदेश नामदेव भोईर यांनाही शिवनेरी भूषण पुरस्कार गौवरवण्यात आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार मिलिंद क्षीरसागर यांना मान्यवरांनी प्रदान केला.