पुणेChhagan Bhujbal On Bhide Wada : मागच्याच आठवड्यात महापालिकेच्या वतीने सर्वाच्च न्यायालयाच्या निकालानंतर भिडे वाड्याची जुनी इमारत ही जमीनदोस्त करण्यात आली होती. आज महापालिकेच्या वतीनं समता परिषदेचे अध्यक्ष आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत भुजबळ यांनी भिडे वाड्याच्या बाबतीत आपली भूमिका जाहीर करत त्याजागी शाळा बांधण्यात येणार असल्याचं सांगितलं. तसेच तिथं कुठेलेही दुकान हे बांधण्यात येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
शाळेला बाहेरून जुन्या पद्धतीचं रूप : यावेळी भुजबळ म्हणाले की, भिडे वाड्याची जमीन ही आता शासनाच्या ताब्यात आलीय. आज आमची यासंदर्भात बैठक झाली आणि तिथं सावित्रीबाई फुले यांची 'पहिली मुलींची शाळा' (First Girls School Bhidewada) होती, तशी शाळा त्या जागेवर बांधण्यात यावी यासाठी प्रस्ताव देण्यात आला. ते करत असताना शाळेच्या आतमध्ये आधुनिक सुविधा असाव्यात. पण बाहेरून जुन्या पद्धतीचं रूप त्या शाळेला देण्यात यावं. तसेच शाळेत सावित्रीबाई फुले यांचं स्मारक आणि त्यांनी केलेल्या कामाची माहिती देखील असावी.