दौंड (पुणे) -कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपन्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपन्याचे दूषित पाणी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर साचून महामार्ग सेवा रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले आहे. याची दखल घेऊन दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी साचलेल्या पाण्याची पाहणी केली.
ग्रामस्थांची कारवाईची मागणी -
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर कंपन्यांचे केमिकल युक्त पाणी साचून त्याचा उग्र वास येत असल्याची तक्रार नागरिकांनी दौंडचे तहसीलदारांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कुरकुंभ कार्यालयात बैठक घेतली. यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकाऱ्यांसह काही ग्रामस्थही उपस्थित होते. त्यात ग्रामस्थांनी येथील औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणाबाबत तक्रारींचा पाढा वाचून संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रश्न हाताळण्यासाठी पंधरा दिवसांचा वेळ मागितला आहे. तर संबंधितांना महामार्गावरील दूषित पाणी उचलण्याचे आदेश दिले आहेत.
तहसीलदारांच्या संबंधितांना सूचना -