महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Crime News : सिरममध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक, गुन्हा दाखल

मंगेश पवार हा तरुणांना सिरममध्ये (Seram Institute Pune) नोकरी देण्याचे अमिष दाखवत त्यांच्याकडून प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये घेऊन त्यांना खोटे नियुक्तीपत्र व बनावट आयडी कार्ड देत होता. (cheating people by promising jobs in Seram). हडपसर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली गेली आहे.

By

Published : Dec 22, 2022, 4:22 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

पुणे :कोरोनाची लस बनवणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट (Seram Institute Pune) मध्ये नोकरीचे आमिष दाखवून अनेक लोकांना फसवल्याचे प्रकरण उघड झाले आहे. (cheating people by promising jobs in Seram). फसवणूक करणाऱ्या मंगेश पवार या आरोपी विरोधात पुण्यातील हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोटे नियुक्तीपत्र व बनावट आयडी कार्ड द्यायचा : मंगेश पवार हा सिरम इन्स्टिट्यूट मधील काही अधिकाऱ्यांचे नावे सांगून अनेक तरुणांची फसवणूक करायचा. तो या तरुणांना कंपनीत नोकरी देण्याचे अमिष दाखवत त्यांच्याकडून प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये घेऊन त्यांना खोटे नियुक्तीपत्र व बनावट आयडी कार्ड सुद्धा देत होता. काही काळानंतर फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दिली. त्यामुळे आता सिरम इन्स्टिट्यूटच्या नावाखाली भामटी टोळी कार्यरत आहे का याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details