पुणे -येथील ओशो आश्रमातील प्रत्येकी दीड एकराचे दोन असे एकूण तीन एकराचे भूखंड आश्रम ट्रस्टकडून विक्रीला काढण्यात आले आहेत. मात्र, या विक्रीला ओशो रजनीश यांच्या अनुयायांनी विरोध केला आहे. शेकडो अनुयायांनी विरोधाची पत्र पाठवली आहेत. या प्रक्रियेविरोधात आता ओशोंचे अनुयायांनी धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या सगळ्या प्रकरणावर 15 मार्चला सुनावणी होणार आहे.
आश्रमाची मालकी ओशो इंटनॅशनल फाऊंडेशनकडे -
ओशो आश्रम हा जगभरात अनुयायी असलेला आश्रम आहे. ओशो रजनीश यांनी सुरू केलेला हा आश्रम पुण्यातील कोरेगाव पार्क येथे अठरा एकर परिसरात आहे. आध्यात्मिक गुरू ओशो यांच्यावर श्रद्धा असलेले अनेक अनुयायी या आश्रमाशी जोडलेले आहेत. सध्या हा आश्रम वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. या प्रसिद्ध ओशो आश्रमातील प्रत्येकी दीड एकराचे दोन असे एकूण तीन एकराचे भूखंड आश्रम ट्रस्टकडून विक्रीला काढण्यात आले आहेत. सध्या या आश्रमात त्याची मालकी स्वित्झर्लंडमधील झुरीच येथील ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनकडे आहे. याच फाउंडेशनच्या माध्यमातून येथील ट्रस्टींनी हे भूखंड विकायला काढले आहेत.
हेही वाचा -छापेमारीवर तापसी...'नॉट सो सस्ती एनीमोर', कंगनाचे धडाकेबाज प्रत्युत्तर